महापौरांना अटक, जनता रस्त्यावर, राष्ट्रपती घामाघुम (नवशक्ती)

महापौरांना अटक, जनता रस्त्यावर, राष्ट्रपती घामाघुम एखाद्या शहराच्या महापौरांना अटक झाली तर थेट देशाच्या राष्ट्रपतींची खुर्ची डळमळीत होऊ शकते का ? सध्या हे सारे तुर्कीमध्ये घडते आहे. देशभर जनता रस्त्यावर उतरुन निदर्शने करीत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. तुर्कीतील घडामोडींचा हा वेध... भावेश ब्राह्मणकर एखाद्या चित्रपट किंवा कादंबरीत शोभावे असे कथानक सध्या तुर्कीमध्ये घडते आहे. निमित्त आहे ते इस्तंबूलचे महापौर इकरम इमामोअलू यांना अटक झाल्याचे. देशभरात जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तुर्कीमध्ये एकूण ८१ प्रांत आहेत. त्यातील ५५ प्रांतांमध्ये निदर्शने सुरू आहेत. काही ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार होत आहे. या सर्वाची दखल घेत राष्ट्रपती रेचेप तैयप्प एर्दोगन यांनी दंगेखोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने जनतेतील असंतोष आणखी वाढीस लागला आहे. शेकडो जणांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही पत्रकारांचाही त्यात समावेश आहे. तर, सरकारविरोधी पोस्ट करणाऱ्या ७०० हून अधिक एक्स (ट्विटर) अकाऊंट बंद करण्याचे आदेश सरकारने काढल...