निवडणूक निकालानंतरही जर्मनीत अस्वस्थताच!

अत्यंत आव्हानात्मक स्थितीतून जाणाऱ्या जर्मनीत सार्वत्रिक निवडणूक निकाल जाहीर झाले. पण, एकाही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. पुन्हा आघाड्यांचे सरकार सत्तारुढ होणार आहे. कठीण अवस्थेतून मार्गक्रमण करणारा युरोप आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे तगडे आव्हान जर्मनीसाठी अतिशय खडतर आहे. भावेश ब्राह्मणकर दुसऱ्या महायुद्धातील क्रूर कर्मा, हुकुमशाह अडॉल्फ हिटलर मुळे ओळखला जाणारा जर्मनी हा युरोपातील एक देश. दुसऱ्या महायुद्धाचा अतिशय काळा इतिहास बाजूला सारत या देशाने लोकशाही स्वीकारली आणि अतिशय वेगाने विकासाकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच जगातील पहिल्या पाच आर्थिक महासत्तांमध्ये येण्याची किमया या देशाने साध्य केली. याचे श्रेय जाते अंजेला मर्केल या महिलेला. जर्मनीच्या चॅन्सेलरपदाची जबाबदारी मर्केल यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. देशातील विविध आव्हानांवर चोखपणे मात केली आणि जर्मनीला आर्थिक आघाडीवर अग्रेसर बनवले. मात्र, त्यांच्या पश्चात जर्मनीत राजकीय आणि सर्वच पातळ्यांवर अडथळ्यांची शर्यत सुरू आहे. गेली चार वर्षे आघाड्यांच्या राजकारण आणि सत्तेचा अनुभव घेणाऱ्या जर्मन नागरिकांनी यंदाच्या सार्वत्रि...