पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय जल अकादमी नक्की काय करते?

जल अकादमी

देशभरातील जल अभियंत्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय जल अकादमी ही पुण्यातील संस्था वाखाणण्याजोगी आहेसंस्थेचा परिसरतिचे कार्य आणि आजवरचा इतिहास हे सारेच देशाच्या विकास कार्यात मोठे योगदान देणारे आहे.

भावेश ब्राह्मणकर

पुण्यातील खडकवासला धरणालगत असलेली राष्ट्रीय जल अकादमीचा परिसर अतिशय रम्य आहेदेशपातळीवर कार्य करणाऱ्या जल अभियंत्यांचे जणू येथे एकदा तरी प्रशिक्षण घेण्याचे स्वप्न असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाहीमहाराष्ट्रात ज्या पद्धतीने महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात मेरी ही काम करतेत्याचपद्धतीने देशपातळीवर जल अकादमी कार्यरत आहेदेशाच्या विविध भागात जल साठवणुकीसाठी धरणांची आणि विविधप्रकल्पांची निर्मिती होत असल्याने यासंदर्भात शास्त्रोक्त आणि प्रभावी माहिती देण्यासाठी राष्ट्रीय जल अकादमी असावी असा विचार पुढे आला

१९८८ मध्ये आंतरराष्ट्रीय विकास अमेरिका एजंसीच्या मदतीने पुण्यामध्ये केंद्रीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलेअत्यंत मर्यादित स्वरुपातील हे केंद्र सुरू झाले पण त्याचा विस्तार करण्याची गरज केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाला कळून चुकलीत्यामुळेच विश्व बँकेच्या अर्थसहाय्यातून भव्य अशी राष्ट्रीय जल अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाखडकवासला धरणालगत या अकादमी साकारण्याच्या कामाचे भूमीपूजन तत्कालिन जलसंपदामंत्री प्रमोद महाजन यांच्या हस्ते करण्यात आलेअकादमीचे काम विहित वेळेत पूर्ण झालेत्यामुळे २००१ मध्ये तत्कालिन केंद्रीय जलसंपदा मंत्री अर्जुन सेठी यांच्या हस्ते अकादमीचे उदघाटन करण्यात आले.

मुठा नदीच्या किनाऱ्यावर ही अकादमी विस्तारलेली आहेयाठिकाणी अत्याधुनिक प्रशिक्षण कक्षगेस्ट हाऊसग्रंथालयकॉम्प्युटर लॅबलाऊंज आदींची सुविधा आहेनिवासी स्वरुपाचे प्रशिक्षणक्रम येथे चालविले जातातअकादमीत चार अत्याधुनिक व्याख्यान कक्ष आहेतएक सेमिनार हॉल आहेऑडिओ व्हिज्युअल स्वरुपाची सुविधाविविध प्रकारचे सादरीकरण दाखविण्यासाठीची सज्जता तेथे आहेआजव या अकादमीतून हजारो अभियंत्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले आहेअकादमीने विविध प्रकारचे प्रशिक्षणक्रम तयार केले आहेतकेंद्र आणि राज्य सरकारांचे  आणि  दर्जाचे अधिकाऱ्यांसाठीमुख्य अभियंतासचिवप्रमुख अभियंता यांच्यासाठी दर्जाच्या कर्मचाऱ्यांसाठी आदींचा त्यात समावेश आहेपदोन्नती मिळाणाऱ्या अधिकारी  कर्मचाऱ्यांसाठी वेगळा प्रशिक्षणक्रम अकादमीने विकसित केला आहेयेथून प्रशिक्षण घेतल्यानंतर कर्मचारी  अधिकाऱ्यांच्या ज्ञानात भर तर पडतेच त्याशिवाय त्यांच्या कार्यात बदल होतो शिवाय कामाच अचूकताही येते.

अकादमीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अद्ययावत असे प्रशिक्षणक्रम तयार केले आहेतत्याचा फायदा जुन्या आणि नव्या अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचारी  अधिकाऱ्यांना होतोजलस्त्रोतांविषयीचा सर्वंकष असा अभ्यास कसा करावाएखादे धरण किंवा जलप्रकल्प साकारताना कुठल्या बाबी महत्त्वाच्या आहेतयाचा प्रामुख्याने विचार केला जातो आणि ते प्रशिक्षणार्थींना सांगितले जातेनिवासी स्वरुपाच्या या प्रशिक्षणात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटीही दिल्या जाताततेथील कार्यपद्धती स्पष्ट केली जातेएखाद्या धरणाचा किंवा जलाशयाचा आराखडा कसा करायचा याचे उत्कृष्ट प्रशिक्षण येथे मिळतेकेंद्र आणि राज्य पातळीवर काम करणाऱ्या विविध संस्थांच्या अधिकारी  कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या विनंतीनुसार प्रशिक्षण दिले जातेमुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली अकादमीचा कारभार चालतोजलसंधारण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्यानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी बोलवले जोजलसमृद्धीसाठी अन्य देश कशा पद्धतीने काम करीत आहेतकुठले तंत्रज्ञान वापरत आहेत याचे सतत अवलोकन अकादमीचे शास्त्रज्ञ आणि प्रशिक्षक करीत असताततसेचपारंपरिक कार्यपद्धतीला तंत्रज्ञान आणि आधुनिकतेची जोड कशी देता येईल यावर अधिक भर दिला जातोनव्याने सेवेत दाखल होणाऱ्यांसाठी विशिष्ट असा प्रशिक्षणक्रम आहे.

जगभरात किती गोड पाणी आहेत्यातील किती टक्के भारतात आहे हे सर्वप्रथम सर्व प्रशिक्षणार्थींना सांगितले जातेआणि आपल्या वाटेला आलेल्या पाण्याचे नियोजन करण्याचे काम आपल्या हातून घडणार असल्याची प्रचिती या प्रशिक्षणातून अधिकारी  कर्मचाऱ्यांना येतेवातावरण बदलाचा जलसंपत्ती आणि जलटंचाईवर नेमका कसा परिणाम होतो आहेया संदर्भातही अकादमीने अभ्यासक्रम तयार केला आहेवाढते शहरीकरणपाण्याची वाढणारी मागणी आणि उपलब्ध जलस्त्रोतआगामी काळात या जलस्त्रोतांवरील ताण याचा विचार अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहेत्यामुळे येथून प्रशिक्षण घेणाऱ्यांना वास्तवाचे भान तर येतेच त्याशिवाय आगामी काळात पाण्याची स्थिती लक्षात घेऊन त्याचे नियोजन करण्याचे बळही मिळतेजलविज्ञानपूरनियंत्रणपूराचे पूर्वानुमानधरणांच्या ठिकाणी साकारले जाणारे विद्युत प्रकल्पनद्यांच्या खोऱ्यातील जैविक विविधता याबाबत शास्त्रोक्त माहिती प्रशिक्षणार्थिंना मिळते

पाण्यासंदर्भातील विविध कायदेसरकारचे धोरणनद्यांचा प्रवाह आणि नदीच्या पाण्यावरील वादतंटे कसे सोडवायचे आदींबाबतची माहिती प्रशिक्षणक्रमात असतेनद्यांच्या खोऱ्यांचा अभ्यास करणे आणि त्याअनुषंगाने उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करणे हे एक आव्हान आहेत्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेव्यवस्थापनात अचूकता आणणे यावर प्रशिक्षकांकडून अधिक भर दिला जातोअकादमीने नो युवर वॉटर हे अनोखे मोबाईल अॅपही साकारले आहेयाद्वारे आपल्या घरातील पाणी कुठून येते इथपासून तर भारत आणि जलसंपत्ती यासंबंधीची विस्तृत माहिती उपलब्ध होतेत्यामुळे अकादमी केवळ प्रशिक्षणापूरता मर्यादित नाही तर सर्वसामान्यांसाठी अॅपची निर्मिती करुन सामाजिकतेचेही दर्शन घडविले आहेकर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत करुन अकादमी देशाच्या जलसुरक्षा आणि संपन्नतेसाठीच योगदान देत आहे.

येथे करता येईल संपर्क
राष्ट्रीय
 जल अकादमीपुणे-सिंहगड रोडखडकवासलापुणे ४११०२४ या पत्त्यावर किंवा ०२०-२४३८०६७८ या संपर्क क्रमांकावर किंवा nwa.mah@nic.in या इमेल आयडीवर संपर्क साधता येईलतसेचअकादमीच्या http://nwa.mah.nic.in/index.htm या वेबसाईटवरही अकादमीविषयी माहिती मिळू शकेल.

bhavbrahma@gmail.com

संरक्षणसामरिकशास्त्रआंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

आपल्याला हा लेख कसा वाटलाआपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

National, Water, Academy, NWA, Pune, Khadakwasala, Institute, Engineers, Training, 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)