डीपसीकच्या भूकंपाचे जगभर हादरे! (नवशक्ती)

अत्यंत कमी खर्च आणि कालावधीत डीपसीक या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर भूकंप घडविला आहे. त्याचा केंद्रबिंदू चीन असला तरी त्याचे जबर हादरे अमेरिकेसह अनेक देशांना बसले आहेत. हे सगळे कसे झाले ? अचानक की जाणिवपूर्वक ? भारताचे काय ? नजिकच्या काळात काय होणार ? भावेश ब्राह्मणकर डीपसीक हे चॅटबॉट ॲ प अवघ्या काही दिवसातच लाखोच्या संख्येने अमेरिकेत डाऊनलोड झाले आणि एकच गहजब उडाला. विशेष म्हणजे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्विकारल्याच्या दिवशीच हे घडावे हा योगायोग होता का ? डीपसीक नक्की काय आहे ? त्याचा एवढा गवगवा का होत आहे ? कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आणि खासकरुन अमेरिकन दिग्गज कंपन्यांच्या पोटात गोळा का उठला आहे ? हजारो जणांचे कोट्यवधींचे नुकसान कसे झाले ? नजिकच्या काळात आणखी काय काय घडणार आहे ? हे सारे जाणून घेतले नाही तर त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावेच लागेल. जे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चॅटजीपीटी, गुगल, मेटा सारख्या दिग्गज कंपन्यांना काही वर्षे आणि अब्जावधीची गुंतवणूक करावी लागली त्यांना चिनी डीपसीकने जबरदस्त तडाखा दिला...