ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

तिबेटमध्ये जगातील सर्वात मोठे धरण ब्रह्मपुत्र नदीवर चीन उभारणार असल्याचे वृत्त जसे धडकले तसे अनेकांचे फोन आणि मेसेज सुरू झाले. भारताचा यावर काय परिणाम होणार ? चीन खरोखरच हे महाकाय धरण बांधणार आहे का ? ब्रह्मपुत्र नदी कोरडी होणार का ? भारताच्या जलविद्युत प्रकल्पाचे काय ? या सर्वांचा घेतलेला हा धांडोळा... भावेश ब्राह्मणकर अखेर चीनने आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. ते म्हणजे जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याचा. त्सांगपो किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो) अर्थात ब्रह्मपुत्र नदीवर हे धरण असणार आहे. आपल्याच अधिपत्याखाली असलेल्या तिबेटच्या भूभागावर हे धरण तब्बल १३७ अब्ज डॉलर खर्चून बांधले जाणार आहे. या धरणामुळे पर्यावरण किंवा कुठल्याही क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार नाहीत, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी केला आहे. तसेच, भारत किंवा बांगलादेश यांना मिळणारे पाणीही कमी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात हा चिनी कावा नक्की काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. तिबेटच्या या महाकाय धरणाची बिजे रोवली आहेत ती १९ व्या शतकातील ५०...