“डुबई” चा धडा! (दै. सकाळ)

चकाचक बिल्डींग आणि भौतिक साधनांचे साम्राज्य असलेली दुबई चक्क पाण्यात असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियात तुफान व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वात बिझी विमानतळही ठप्प झाले आहे. हे सारे का आणि कसे घडले ? भावेश ब्राह्मणकर पर्यावरण आणि संरक्षणशास्त्र विषयाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार धो धो पाऊस... पाण्यात तुंबलेले रस्ते... ठप्प झालेली वाहतूक... कसला तरी आडोसा शोधणारे नागरिक... पाण्याच्या डबक्यात उभे असलेले विमान... या आणि अशा कितीतरी फोटो, व्हिडिओनी सध्या सोशल मिडिया जणू ओसांडून वाहतो आहे. चर्चा आहे ती दुबईच्या “ डुबई ” ची. ढगफुटीसदृश पावसाने दुबईची पार वाताहत झाली आहे. जुलै २००५ मध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा अशीच जलमय बनली होती. त्यावेळीही त्याची जबरदस्त चर्चा झाली. वाळवंटी प्रदेश असलेल्या दुबईत अशा प्रकारे आणि एवढा पाऊस का झाला, दुबईची डोळे दिपावणारी भौतिक प्रगती एवढी कशी तकलादू ठरली, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आखाती प्रदेशाचा एक भाग असलेल्या दुबईमध्ये सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस अशरशः कठीण परीक्षा बघणारेच ठरले. दुबईत सोमवारी रात्री पावसाला सुरुवात झा...