ऑफबीट करिअर – वन व्यवस्थापन

ऑफबीट करिअर – वन व्यवस्थापन जंगल हे पृथ्वीचे फुफ्फुस मानले जाते. हे फुफ्फुस सुरक्षित राहिले तर आपण सर्वच जण कुशल राहू शकतो. जंगलांच्या क्षेत्रात मौल्यवान अशी संपत्ती नांदते आणि हीच संपत्ती आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी सहाय्यभूत ठरते. म्हणूनच जंगलांमधील वनसंपदा टिकविणे महत्त्वाचे आहे. केवळ झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश देवून फायदा नाही. आपल्यात खरंच वृक्ष प्रेम असेल तर याच वृक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आपण करिअर करु शकतो. भावेश ब्राह्मणकर पृथ्वीचा ३१ टक्के भूभाग वनांनी व्यापलेला आहे. त्यातील ३८ टक्के वाटा हा प्राथमिक वनांचा आहे. विशेष म्हणजे, विश्वातील ३० कोटी लोकांचे आश्रयस्थान वनेच आहेत आणि १६० कोटी लोकांचे जीवन वनसंपदेवरच अवलंबून आहे. वनसंपदा आणि त्याचा व्यापार गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढला आहे. एकट्या २००४मध्ये जंगलातून मिळणाऱ्या उत्पादनातून ३२ हजार ७०० कोटी अमेरिकन डॉसलर्सचा व्यापार झाला. लाकूड आणि इतर वस्तूंच्या निर्मितीसाठी ३० टक्के वने कापण्यात आली. त्यामुळेच २०११ हे वनवर्ष साजरं करण्याचा मनोदय होता. भारतातही हिमालयाच्या पायथ्यापासून खाली पश्चिम घाटापर्यं...