सीमावादाचा पुनरुच्चार नेपाळचे आक्रमक धोरण (दै. नवशक्ती)

नेपाळ सरकारने १०० रुपयांच्या नव्या नोटेवरील नकाशाद्वारे भारत-नेपाळ सीमावादाला पुन्हा एकदा फोडणी दिली आहे. नेपाळचे हे धाडस नेमके कशाचे द्योतक आहे ? भावेश ब्राह्मणकर संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार नेपाळ सरकारने लिपुलेख , लिम्पियाधुरा आणि कालापानी या भारतीय सीमेलगतचे वादग्रस्त प्रदेश दर्शविणाऱ्या नकाशासह १०० रुपयांची नवी नोट छापण्याची घोषणा केली आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिपरिषदेची बैठक २५ एप्रिल आणि २ मे रोजी झाली. या दोन्ही बैठकीत १०० रुपयांच्या नोटेची पुनर्रचना करण्यास आणि नोटेवरील जुना नकाशा बदलण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तशी माहिती नेपाळच्या मंत्र्यांनी दिली आहे. यापूर्वी १८ जून २०२० रोजी नेपाळने आपल्या संविधानात सुधारणा केली. त्यानुसार, लिपुलेख , कालापानी आणि लिम्पियाधुरा हे तीन धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे भाग आपल्या देशात समाविष्ट केले. तसेच, नेपाळचा राजकीय नकाशा अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. भारताने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. हे "एकतर्फी कृत्य" असल्याचे स्पष्ट केले. हे तिन...