ऑफ बिट करिअर -- कृषी अभियांत्रिकी
ऑफ बिट करिअर -- कृषी अभियांत्रिकी ‘मला इंजिनिअर व्हायचं’ असं म्हणणाऱ्यांची आज कमी नाही. सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, आयटी यासारख्या काही शाखांकडेच विद्यार्थ्यांचा कल असतो. पण, अभियांत्रिकी क्षेत्रात आजघडीला असंख्य शाखा आहेत. त्यातील काहींची तर केवळ तोंडओळखच असल्याने त्याकडे फार कुणाचा कल नसतो. कृषी अभियांत्रिकी (अॅग्री इंजिनिअरींग) ही शाखा त्यापैकीच एकत म्हणावी लागेल. या शाखेत शिक्षणाच्या आणि त्यानंतर नोकरीच्या अमाप संधी आहेत. येत्या काळाचा विचार करुन या शाखेत प्रवेश घेणं आणि त्यात करिअर करणं हा अत्यंत सूज्ञपणाच ठरणार आहे. भावेश ब्राह्मणकर शहरात राहणाऱ्या मंडळींचा कृषी क्षेत्राशी फारसा परिचय राहत नाही. पण, वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणाऱ्या अन्नधान्याचा विचार करता कृषी क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळात कृषी क्षेत्रातही झपाट्याने बदल होत आहेत. नांगरणी, कुळवणी, तण काढणे, पाणी देणे, पीक कापणे, धान्य मळणे व साठवणी या शेतीच्या कामांसाठी कमीत कमी माणसांचा उपयोग करून यंत्रांच्या साहाय्याने शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणाऱ्या शाखेला कृषी अभियांत...