पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऑफ बिट करिअर - क्लिनिकल रिसर्च

इमेज
ऑफ बिट करिअर - क्लिनिकल रिसर्च एखाद्या रोगाला अटकाव करणारे औषध शोधून काढणे तसे जिकरीचेच आहे. नवे औषध शोधतानाच त्याची चाचणी आणि मानवी शरिरावरील अपायांची शहानिशा करणारी शाखा म्हणजे क्लिनिकल रिसर्च. आजच्या घडीला या शाखेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. या शाखेत नव्या संधींबरोबरच पैसाही असल्याने या क्षेत्राचा करिअरसाठी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.  भावेश ब्राह्मणकर मानवी जीवनशैली आणि आहार यांचा आरोग्याशी मोठा संबंध आहे. आजच्या धकाधुकीच्या काळात फास्ट फूड किंवा तत्सम पदार्थांकडे सर्वाचा कल असतो. त्यातच जेवणाच्या वेळा निश्चित नसणे, व्यायामाचा अभाव, सकस अन्नपदार्थांची कमतरता, कामाच्या ठिकाणी असलेला ताण, प्रदूषणाचा विळखा या आणि अशा विविध कारणांमुळे मानवी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यावसायिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात विविध पातळ्यांवर लढणाऱ्या माणसांना विविध रोगांच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव डोके वर काढत असल्याने या रोगांना समूळ नष्ट करणारी औषधे अपरिहार्य बनली आहेत. फार्मसी अर्थात औषध निर्माणशास्त्राद्वारे औषधांचा डोस उपलब्ध ह...

ऑफबीट करिअर - हॉटेल मॅनेजमेंट - असे करा आदरातिथ्य

इमेज
ऑफबीट करिअर - हॉटेल मॅनेजमेंट - असे करा आदरातिथ्य ‘अतिथी देवो भव’ ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. त्यामुळेच आदरातिथ्याला विशेष असा दर्जा आहे. आजच्या आधुनिक भाषेत सांगायचे तर हॉटेल इंडस्ट्रीच्या माध्यमातून पर्यटकांचा आदर करणे, त्यांना सेवा आणि सुविधा देण्याचे हे क्षेत्र आहे. या क्षेत्रात करिअर करुन अनेकांना समाधानी करण्याचे श्रेय आपल्याला मिळू शकते.   भावेश ब्राह्मणकर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०११मध्ये पर्यटकांनी सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला दिली आहे. २०११मध्ये १९.५ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी देशातील विविध राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना भेटी दिल्या. याचाच अर्थ देशात पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय या दोन्ही एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत, असे म्हटले तर वावगे ठरत नाही. त्यामुळे पर्यटनात हॉटेल व्यवसाय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.  पर्यटन व्यवसायाची जसी वाढ होते आहे तशी देशभरातील हॉटेलची संख्याही. देशात १० लाखांहून अधिल लहान-मोठी हॉटेल्स असल्याचे सांगण्यात येते. एका संस्थेच्या अहवालानुसार, देशातील १२० कोटी लोकसंख्येपैकी १० कोटी ...