नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक का? आणि कसा झाला? (नवशक्ती)

नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक का ? आणि कसा झाला ? नेपाळमधील अराजकतेला तेथील तरुणच कारणीभूत आहेत की काही परकीय शक्ती त्यात गुंतलेल्या आहेत ? एवढा जनक्षोभ अचानक उसळला की कट रचण्यात आला ? काय घडत होते आतल्या गोटात ? भावेश ब्राह्मणकर हिमालयाची कुशी आणि छोटेखानी भौगोलिक सीमा असलेल्या नेपाळमध्ये तीन दिवस अराजक माजले. रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईने हिंसक आंदोलन हाती घेतले. तरुणांचा राग एवढा प्रचंड होता की त्यांनी संसदेसह अनेक सरकारी मालमत्ता पेटवून दिल्या. एवढ्यावरच हे थांबले नाही तर माजी पंतप्रधान, अर्थमंत्री, लोकप्रतिनिधींना गाठून त्यांचे कपडे फाडण्यासह त्यांना बेदम मारहाण केली. जसा एखादा ज्वालामुखी जागृत होतो तसे तरूण आक्रमक आणि हिंसक झाले. हे सारे अनपेक्षित म्हणता येईल का तर मुळीच नाही. या अस्थैर्याला बरेच कंगोरे आहेत. नेपाळ सरकारने व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब यासारख्या सोशल मिडियावर बंदी घातली. पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या नेतृत्वातील सरकारने यासंदर्भात गेल्या महिन्याभरापासून हालचाली सुरू केल्या होत्या. सरकारच्या परवानगीशिवाय सोशल मिडिया कंपन्या बक्कळ पैसा कम...