पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक का? आणि कसा झाला? (नवशक्ती)

इमेज
नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक का ? आणि कसा झाला ? नेपाळमधील अराजकतेला तेथील तरुणच कारणीभूत आहेत की काही परकीय शक्ती त्यात गुंतलेल्या आहेत ? एवढा जनक्षोभ अचानक उसळला की कट रचण्यात आला ? काय घडत होते आतल्या गोटात ? भावेश ब्राह्मणकर हिमालयाची कुशी आणि छोटेखानी भौगोलिक सीमा असलेल्या नेपाळमध्ये   तीन दिवस अराजक माजले. रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईने हिंसक आंदोलन हाती घेतले. तरुणांचा राग एवढा प्रचंड होता की त्यांनी संसदेसह अनेक सरकारी मालमत्ता पेटवून दिल्या. एवढ्यावरच हे थांबले नाही तर माजी पंतप्रधान, अर्थमंत्री, लोकप्रतिनिधींना गाठून त्यांचे कपडे फाडण्यासह त्यांना बेदम मारहाण केली. जसा एखादा ज्वालामुखी जागृत होतो तसे तरूण आक्रमक आणि हिंसक झाले. हे सारे अनपेक्षित म्हणता येईल का तर मुळीच नाही. या अस्थैर्याला बरेच कंगोरे आहेत. नेपाळ सरकारने व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब यासारख्या सोशल मिडियावर बंदी घातली. पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या नेतृत्वातील सरकारने यासंदर्भात गेल्या महिन्याभरापासून हालचाली सुरू केल्या होत्या. सरकारच्या परवानगीशिवाय सोशल मिडिया कंपन्या बक्कळ पैसा कम...

...म्हणून नाशिकला झाले मिग २१ चे उत्पादन (साप्ताहिक सकाळ)

इमेज
...म्हणून नाशिकला झाले मिग २१ चे उत्पादन भारताच्या सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात इतिहास घडविणारी मिग २१ ही लढाऊ विमाने सेवानिवृत्त होत आहेत. या विमानांचे संपूर्ण उत्पादन नाशिकच्या ओझरमध्ये झाले. ते कसे सुरू झाले ? त्यापूर्वी कुठल्या नाट्यमय घडामोडी घडल्या ? या विमानांमुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची पायाभरणी कशी झाली ? यांचा घेतलेला हा धांडोळा... भावेश ब्राह्मणकर ही घटना आहे १९६२ ची. चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षणमंत्री पदासाठी यशवंतराव चव्हाण यांना पाचारण केले. चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत चव्हाण यांनी संरक्षणमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, केंद्रात मंत्री झाल्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत खासदार होणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन नाशिककरांनी चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिले. हे ऋण फेडण्यासाठी चव्हाण यांनी नाशिकला मोठा संरक्षण प्रकल्प देण्याचे जाहीर केले. चीन युद्धामुळे भारताला जाणिव झाली ...

चीनच्या भव्य शक्तिप्रदर्शनाने जगाला धडकी (नवशक्ती)

इमेज
चीनच्या भव्य शक्तिप्रदर्शनाने जगाला धडकी तब्बल २६ देशांच्या प्रमुख उपस्थितीत चीनने जे भव्य शक्ती प्रदर्शन केले ते डोळे दिपावणारे आणि जगाला धडकी भरवणारेच आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेला खडबडून जागे करतानाच जगाच्या आगामी वाटचालीचे संकेतही चीनने दिले आहेत. भावेश ब्राह्मणकर दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राजधानी बीजिंग येथे चीनने भव्य दिव्य स्वरूपाच्या लष्करी संचलनाचे आयोजन केले. विशेष म्हणजे, या शक्तिप्रदर्शनाला थोडेथोडके नव्हे तर तब्बल २६ देशांचे प्रमुख उपस्थित होते. यामध्ये रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन, उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबिआंतो, कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहामोनी, व्हिएतनामचे अध्यक्ष ल्युओंग क्युओंग, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, म्यानमारचे लष्करशहा मिंग आँग लेइंग, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ याचबरोबर कझाकस्तान, काँगो, क्युबा, मंगोलिया...