‘नाटो’ची वाटचाल (अ)सुरक्षिततेकडे! (नवशक्ती)

‘ नाटो ’ ची वाटचाल (अ)सुरक्षिततेकडे ! जगातील अनेक देशांवर राज्य करणाऱ्या, अनेक राष्ट्रांना लुटून स्व उत्कर्ष साधणाऱ्या आणि उपभोगवादी प्रवृत्तींनी झपाटलेल्या देशांना त्यांची सुरक्षा कमकुवत असल्याचे वाटू लागले आहे. म्हणूनच ‘ नाटो ’ च्या छत्राखालील या देशांनी आता जीडीपीच्या थेट पाच टक्के खर्च संरक्षणावर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाटचाल (अ)सुरक्षिततेकडेच जाणारी आहे. भावेश ब्राह्मणकर इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले, इतरही अनेक देशांवर झडप घालून त्यांना लुटले. जगातील एवढ्या देशांवर त्यांचे वर्चस्व होते की, ‘ इंग्लंडच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता ’ , असे म्हटले गेले. अशाच प्रकारे युरोपातील पोर्तुगीज, डच, फ्रेंच आदी देशांनीही लहान-मोठ्या अनेक देशांवर कब्जा मिळवला. त्यांची बेसुमार लूट केली. मानवी हक्कांचे सर्रास उल्लंघन करुन त्यांचे शोषण केले. त्या त्या देशातील मौल्यवान साधन-संपत्तीवर हक्क सांगून ती आपल्या ताब्यात घेतली. जगाच्या इतिहासातील ही काळी पाने पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे नेदरलँडच्या हेगमध्ये झालेली नाटो शिखर बैठक. या बैठकीत नाटो सदस्यांनी मोठा निर्णय घेऊन सं...