खासदार शिष्टमंडळाच्या शिष्टाईचे यशापयश (नवशक्ती)

खासदार शिष्टमंडळाच्या शिष्टाईचे यशापयश पहलगाम हल्ल्यानंतर भारताची भक्कम बाजू आणि पाकिस्तानचे पितळ उघडे पडण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ सध्या देशोदेशीचे दौरे करीत आहे. या शिष्टमंडळाच्या शिष्टाईला कितपत यश आले आहे ? पाकिस्तानवर त्याचा काय आणि किती परिणाम होत आहे ? याचा विचार करणे आवश्यक आहे. भावेश ब्राह्मणकर काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांवर अमानुषपणे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारताच्या खूपच जिव्हारी लागला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे दिसून आले. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील एकूण नऊ दहशतवादी स्थळांना नष्ट करण्यात आले. मात्र , तडकाफडकी शस्त्रसंधी करण्यात आली. जी आजही कायम आहे. या शस्त्रसंधी संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. असो. एवढे मोठे ऑपरेशन राबवूनही पाकिस्तानला कुठलाही फटका बसत नाही किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांकडून पाकिस्तानला एकटे पाडले जात नाही किंवा त्यांच्यावर कारवाई स्वरूप कुठलाही निर्णय होताना दिसत नसल्याने भारताने अखेर वेगळे अस्त्र...